तीन लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी सात लाख रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर साडेतीन लाख रूपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारीवरून केली. त्यावरून आज सापळा रचून दोघांपैकी एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. 

रात्री  उशिरापर्यंत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अशोक शशिकांत गाडे (पोलीस शिपाई, कोपरगाव पोलीस ठाणे), अल्ताफ अहमद शेख (पोलीस हवालदार, शिर्डी पोलीस ठाणे) अशी दोघांची नावे आहेत. Loading...
याबाबत समजलेली माहिती अशी, तक्रार व त्याच्या भावाचे नाव ट्रॅक्टर चोरीच्या प्रकरणातून वगळण्यात यावे यासाठी वरील दोघांना सात लाख रूपये लाचेची मागणी. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. दरम्यान, तडजोडीनंतर साडेतीन लाख रूपये देण्याचे ठरले होते. 

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून अशोक गाडे याला तीन लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दुसरा आरोपी अल्ताफ शेख हा पसार झाला आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्रीउशिरापर्यंत सुरू होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.