एक इंचही जमिन केके रेंजसाठी अधिग्रहीत होऊ देणार नाही - निलेश लंके


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वेळ पडली तर मी रणगाड्याखाली झोपेल पण या भागातील एक इंचही जमिन केके रेंजसाठी अधिग्रहीत होऊ देणार नाही असे आश्वासन निलेश लंके यांनी दिले. नगर तालूक्यातील इस्लामपूर, नांदगाव, शिंगवे या गावांमधील निलेश लंके युवा प्रतिष्ठानच्या शाखा उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.

नगर तालूक्यातील विळद, नांदगाव, शिंगवे, कोळपे आखाडा, पिंप्री घूमट, इस्लामपूर, खारे कर्जूने या गावांनी या पूर्वीही केके रेंजच्या विस्तारीकरणासाठी योगदान दिले आहे या भागातील शेतकऱ्यांची आता पून्हा विस्थापित होण्याची तयारी नाही. 


सामाजिक वनीकरण, वनविभाग, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या ताब्यात लाखो एकर जमिनी आहेत. त्यातील जमिनी शासनाने संरक्षण खात्याच्या प्रकल्पांसाठी घ्याव्यात. विदर्भ, मराठवाडा दुष्काळी भाग आहे. तेथील शेतकरी स्वखुषीने जमीनी देऊ शकतो. 

Loading...
नगर तालूक्यातील बागायत जमिनी देण्याची मानसिकता राहिली नाही. वेळ पडली तर मी रणगाड्याच्या खाली झोपेल, पण या भागातील एक इंचही जमीन केके रेंजसाठी अधिग्रहीत होवू देणार नाही. त्यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची येथील शेतकऱ्यांसमवेत आपण भेट घेणार असून त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न दिल्ली दरबारी मांडू. 

या भागातील तरूणांच्या हाताला रोजगाराची आवश्यकता आहे. नगर एमआयडीसीतील उद्योग दिवसोंदिवस कमी होत आहेत. तरूण रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. पण यावर आमदार विजय औटी यांनी कधीही आवाज उठवला नाही. 

विकास कामांच्या नावाखाली टक्केवारी करणारे आमदार औटी सर्वसामान्यांचे नाही तर फक्त ठेकेदारांचे भले पहाणारे आहेत. आता सर्वसामान्य जनतेला त्यांचे खरे रूप कळून आले आहे. येत्या विधानसभा निवडणूकीत नगर तालूका औटींना धडा शिकल्याशिवाय रहाणार नाही, असेही लंके या वेळी म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.