श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर जीपच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावरील प्रभात डेअरीशेजारी माहेश्वरी स्टिलसमोर काळ्या पिवळ्या जिपने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दि. १६ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.छाया भरत गाडे (वय २०, रा. प्रभात डेअरी शेजारी) असे मयत महिलेचे नाव आहे. 


Loading...
याप्रकरणी नाथा मार्तंड गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की माझी सून छाया कामावरून घरी परतत असताना माहेश्वरी स्टिलसमोरील आपल्या घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना संगमनेरकडून श्रीरामपूरच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या पिवळ्या मॅजिक जिपने (क्रमांक एमएच १७ एव्ही ४९३५) तिला जोराची धडक दिली. यात तिचा मृत्यू झाला. 

अपघातानंतर चालक पळून गेला. याप्रकरणी जिपच्या चालकाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४१/१८ नुसार अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जालिंदर लोंढे करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.