श्रीगोंद्यात झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथील रहिवासी तरुण दीपक दत्तात्रय शिंदे याने आढळगाव शिवारात दत्तात्रय निवृत्ती शिंदे यांच्या विहिरीच्या कडेला लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 


Loading...
आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेबाबत संतोष आनंदराव शिंदे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आढळगाव शिवारात मेहेत्रे वस्ती शिवारात रविवारी सकाळी काही शेतकरी आपल्या शेतात गेले होते. तांदळी दुमाला येथील शेतकरी शिंदे यांच्या शेतजमिनीच्या कडेला एक मोटारसायकल दिसली. 

म्हणून ते त्या मोटारसायकल जवळ गेले. तेथे कोणीही दिसले नाही म्हणून कोणाची मोटारसायकल कोणी आणली येथे तर कोणच दिसत नाही, म्हणून विहिरीकडे गेले असता विहिरीतील झाडाला एका युवकाचा मृतदेह लटकलेला दिसला. या शेतकऱ्यांनी तत्परतेने पोलिसांना व शेतजमीन मालकाला माहिती दिली. 


सदरचा युवक हा तांदळी दुमाला येथील असल्याचे समजले. पोलिसांनी पंचनामा करून मृताची ओळख पटल्याने प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.दीपक शिंदे याने येथे येऊन का आत्महत्या केली. याचा तपास पो ना रोहिदास झुंजार हे करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.