'संजू'मध्ये कमली साकारणारा खरा कमलेश कोण?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अभिनेता संजय दत्तची बायोपिक संजू सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शुक्रवारी 29 जून रोजी प्रदर्शित झालेल्या संजू सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. या सिनेमाने अवघ्या तीन दिवसात 120 कोटींपेक्षाही जास्त गल्ला जमवला आहे.

Loading...
या सिनेमात जसं रणबीरच्या अभिनयाचं कौतुक होत आहे, तसंच संजू च्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलही वाहवा मिळवत आहे. विकी कौशलने संजय दत्तच्या कमलेश नावाच्या मित्राची भूमिका साकारली आहे.

संजू चा मित्र कमलेशचं खरं नाव काय?
या सिनेमात संजय दत्तचा अगदी जीवलग मित्र कमलेश उर्फ कमली दाखवण्यात आला आहे. पिंकविला रिपोर्टनुसार संजय दत्तच्या खऱ्या आयुष्यातील या जीवलग मित्राचं नाव परेश गिलानी आहे.परेशची भूमिका कमलेशच्या रुपात विकी कौशलने केली आहे.

बिझनेसमन परेश
परेश गिलानी हे एक बिझनेसमन आहेत. ते सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. परेश आणि संजय दत्तची मैत्री शाळेत झाली होती. दोघे नेहमीच एकमेकासोबत होते. दोघांनी कठीण काळात एकमेकांना साथ दिली.

संजय दत्तची आई नर्गिस दत्त रुग्णालयात दाखल असतात, तेव्हा कमलेश आणि संजू यांची भेट होते असं या सिनेमात दाखवलं आहे. कमलेश स्वत: नर्गिस यांचा मोठा फॅन आहे. दोघांची मैत्री काळानुसार घट्ट होत जाते.परेश खूपच लाजरेबुजरे असल्याने, ते संजूसोबत कधी स्पॉटलाईटमध्ये आले नाहीत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.