कर्जतमध्ये ट्रक आणि स्कॉर्पियोच्या अपघातात ५ वारकरी ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर सोलापूर महामार्गावर रविवारी पहाटे चारच्या सुमाराला स्कॉर्पियो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये स्कॉर्पियोमधील पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर एक नऊ वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील रहिवासी आहेत. 


Loading...
दगडू आनंदा भणगे (वय, 50), बाळासाहेब लक्ष्मण माळवदे (वय 50), रमेश भाऊसाहेब कातोरे (वय 51), द्रोपदाबाई भाऊसाहेब कातोरे (वय 70, सर्व रा. खरवंडी, ता नेवासा), हनुमान अंबादास दुसे (रा. खुराडी, ता. जामखेड) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. सत्यम रमेश कातोरे (वय 16, रा. खरवंडी, ता नेवासा) असे जखमीचे नाव असून त्‍याच्यावर जामखेड येथील रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

रविवारी सकाळी चार वाजता नगर सोलापूर महामार्गावर पाटेवाडी शिवारामध्ये हा अपघात झाला. स्कॉर्पिओ गाडी पंढरपूर पंढरपूर येथून नेवासाकडे जात होती तर ट्रकही सोलापूरच्या दिशेने जात होता. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. कर्जत तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.