अंगावर खरकटे पाणी उडाल्याचा कारणावरून विद्यार्थ्याला मारणाऱ्या शिक्षकाविरूद्ध गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अंगावर खरकटे पाणी उडाल्याचा कारणावरून प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला मारणाऱ्या शिक्षकाविरूद्ध बालन्याय हक्क, मुलांचे संरक्षण व काळजी या कलमानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल केला. तालुक्यातील कुक्कडवेढे येथील जिल्हा परिषदेच्याी शाळेत ६ जुलै रोजी ही घटना घडली.
Loading...

तिसरीत शिक्षण घेणारा तान्हाजी पटेकर हा दुपारच्या सुटीत जेवण करुन डबा धुण्यासाठी नळावर गेला होता. यावेळी नळाजवळ रमेश वाघ हे शिक्षकही जेवणाचा डबा पाण्याने धूत होते. विद्यार्थी तान्हाजी डबा धुत असताना नळाच्या प्रेशरने डबा भरला जाऊन खरकटे पाणी शिक्षक वाघ यांच्या डोक्यावर सांडले. राग अनावर झाल्याने शिक्षक वाघ यांनी तान्हाजीला मारले. या प्रकरणी नानासाहेब पटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.