आ. मुरकुटे यांची सोशल मिडीयावर बदनामी भाजपा कार्यकर्त्यांचे कारवाईचे निवेदन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोशल मिडीयावर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याविरुद्ध टीका करण्यात आल्याने संबंधित लोकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस स्टेशनला देण्यात आले.


याप्रकरणी नेवासे नगरपंचायतीचे नगरसेवक सचिन नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, गेल्या आठ दिवसांपासून शनिशिंगणापूरचे विश्वस्त डॉ. वैभव शेटे, बापूसाहेब शेटे व सरपंच बाळासाहेब बानकर आदी देवस्थानने केलेली बोगस नोकरभरती, वाहनांची माहिती व कामगारांचे पगारपत्रक ही माहिती मिळावी म्हणून उपोषणास बसले होते. 


Loading...
वास्तविक उपोषणकर्त्यांची मागणी भरती प्रक्रिया रद्द करणे ही मुळीच नव्हती; मात्र भरती प्रक्रिया रद्द करून त्याचा संबंध उपोषणकर्ते व आमदार मुरकुटे यांच्याशी जोडून समाजामध्ये आमदारांची बदनामी करून कामगारांमध्ये आमदार मुरकुटे यांच्याविषयी रोष निर्माण करून प्रतिउपोषणास कामगारांना भाग पाडले. 

आमदार मुरकुटे यांच्या बद्दल बदनामीकारक पोस्ट फेसबुकवर अपलोड करून त्यांची बदनामी केली आहे. आमदारांची समाजामध्ये बदनामी होऊन सामाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सोशल मिडियाद्वारे केला जात आहे. या इसमाविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रभारी पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांना देण्यात आले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.