अकोल्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरात आपल्या आईसमवेत राहाणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या नातेवाईकानेच विनयभंग केल्याची घटना घडली असून या घटनेने शहरात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला अकोले पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.अकोले पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल केला आहे. 

Loading...
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, अल्पवयीन १२ वर्षीय मुलीची आई आपल्या पतीशी पटत नसल्याने सुमारे पाच वर्षांपासून मुलीला घेऊन वेगळे राहते. पीडित मुलीचा भाऊ हा तिच्या वडिलांकडे राहतो. ते पूर्वी संगमनेरला राहात असत. पीडित मुलीचा नातेवाईक मुलीच्या घरी येत होता. तो मुलीला व तिच्या आईला शिर्डी व वणी येथे फिरायलाही घेऊन गेला होता. 

२८ मे २०१८ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपी मुलीच्या घरी आला. तो तिच्याशी बळजबरी करु लागला असता, मुलीने आरडाओरडा केला. त्यामुळे मुलीच्या आईने तिला त्याच्या तावडीतून सोडविले. नंतर पुन्हा दि. १६ जुलै २०१८ रोजी मुलगी सायं. ५ वाजता शाळा सुटल्यावर शाळेसमोरून जात असताना आरोपीने तिला मोटारसायकलवर बसवून नेत एका फर्निचरच्या दुकानामागे रस्त्यावर थांबून तिच्याबरोबर लगट करण्याचा प्रकार केला, अशी तक्रार या मुलीने अकोले पोलिसांत दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. १२५/१८ नुसार भादंवि कलम ३५४ (ए) (डी), पोक्सो कायदा कलम ७, ८, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.