देवदैठण मध्ये ज्ञानप्रबोधन शिबिरात विद्यार्थी झाले वारकरी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :२१ वर्षांपासून अध्यात्मिक आणि वैचारिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या श्री संत सेवा संघाच्यावतीने देवदैठण मध्ये अनिवासी ज्ञानप्रबोधन शिबिराची सुरुवात झाली आहे.

या शिबिराचे उद्घाटन दधीचि ऋषि देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री गंगाराम कौठाळे आणि विद्याधाम प्रशाला देवदैठण चे प्राचार्य शितोळे सर यांच्या हस्ते झाले . यावेळी तुषार वाघमारे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . दिनांक २१जुलै ते २२ जुलै या कालावधीत चालणाऱ्या या शिबिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले काम खरंच कौतुकास्पद आहे. आयुष्याच्या शेवटी अध्यात्माकडे वळण्यापेक्षा लहान वयात हे दिव्य विचार मुलांना समजले तर यातून नवा भारत उभा राहील अशी भावना या वेळी गंगाराम कौ ठाळे यांनी व्यक्त केली. 

उपक्रमशील प्राचार्य शितोळे सर यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि यापुढे देखील प्रशालेच्या वतीने सहकार्य करू असे आश्वासन दिले . संस्थेच्या कार्यकर्त्यांनी देखील या वेळी मनोगते व्यक्त केली . आत्मिक समाधान यानिमित्ताने मुलांना मिळत आहे .

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पाठ्यक्रम ,निशुल्क निवासी ज्ञान प्रबोधन शिबिरे ,साप्ताहिक चिंतन वर्ग ,आत्मज्ञान चित्रप्रदर्शन, प्रवचन ऑडिओ सीडी अशा माध्यमातून संस्थेच्या वतीने ज्ञान सेवा सुरू आहे.

पुणे ,नाशिक, कोल्हापूर, नागपूर ,भोर ,खंडाळा ,खामगाव ,अहमदनगर ,बारामती फलटण ,अकलूज अशा विविध विभागांमध्ये संस्थेचा कार्यविस्तार सुरू आहे .यातीलच एक भाग म्हणून देवदैठण इथे अनिवासी ज्ञानप्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आजतागायत सुमारे पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आणि हे विद्यार्थी संत विचाराने भारावून गेले .साप्ताहिक चिंतन वर्ग तसंच नित्य साधना वर्गातून संस्थेला कार्यकर्त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे संख्याबळ मिळाले. 


परम पूज्य श्री संजय गोडबोले गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आता संस्था वाटचाल करत आहे .संस्थेच्या माध्यमातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पाठ्यक्रम हा शालेय उपक्रम सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिली संस्था बनण्याचा मान श्री संत सेवा संघाला मिळाला!

दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञानाबरोबरच व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य विकास आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. येथील कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे या शिबिराला आता रंग चढला आहे. 


याठिकाणी संस्थेचे कार्यकर्ते मंगेश पडवळ, सोनाली पडवळ ,तुषार वाघमारे ,अर्चना भालेकर, प्रांजल बोरुडे ,स्नेहल पेहरे,चैताली दरेकर, गणेश शिंदे प्रतिभा घुबे ,प्रतिमा भोसलेे, माधुरी भालेकरआदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. देव दैठण गावातले गावकरी देखील या अध्यात्मिक वातावरणात विद्यार्थ्यांसोबत या शिबिरात सहभागी होत आहेत .
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.