श्रीगोंद्यात आढळला परप्रांतीय तरुणाचा मृतदेह.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे एका पंचवीस वर्षीय परप्रांतीय तरुणाचा मृतदेह आढळून आला असून, त्याची ओळख पटवण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. त्याचे नाव लालचंद कैलास नारायणलोडा रा.मध्यप्रदेश असे आहे. तो पेडगाव येथील शहाजी खेडकर यांच्या हॉटेलमध्ये मागील एक वर्षापासून काम करत होता आणी तिथेच राहात होता. 

Loading...
त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याची माहीती तपासात पुढे आली आहे.तसेच तो गावाकडे देखील गेला नव्हता गावाकडे फोन करुन तो चीडचीड करायचा असे हॉटेल मालक खेडकर यांनी पोलिसांना सांगितले. दि.१६ रोजी लोडा हा खेडकर यांच्याकडून ४०० रुपये घेऊन पंढरपूरला जाऊन येतो असे म्हणून निघून गेला. त्यावर खेडकर यांनी त्याच्याशी अनेकदा संपर्क साधला. 

परंतु त्याच्याशी संपर्क झाला नाही. त्याचा मोबाईल बंद होता, शनिवार दि. २१ रोजी दुपारी पेडगाव येथील दिलीप कराळे यांच्या शेतात एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याचे पोलिसांना माहिती समजली. पोलिसांना या मृतदेहाच्या खिशात एक डायरी सापडली. त्यावर हॉटेल मालक खेडकर यांचे नाव असल्यामुळे त्यांना संपर्क साधून घटनास्थळी बोलावले, तेव्हा सदर मृतदेह हा लोडा याचाच असल्याचे त्यांनी सांगितले. शहाजी खेडकर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.