महापालिकेचा मलेरिया विभाग कोमात,नगरकरांचे आरोग्य धोक्यात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पावसाळ्याचे आगमन झाले असता, डास उत्पत्ती थांबवून साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय करणारे महापालिकेचे मलेरिया विभागच कोमात असल्याचा पर्दाफाश राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा रेखा जरे पाटील यांनी आज पहाटे केला. 

जुन्या महापालिके समोरील गॅरेजच्या आवारात पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या मेलेरिया विभागात उपलब्ध नसलेली यंत्रसामुग्री, अस्वच्छता, गळके पत्रे, अपुरे मनुष्यबळ आदी दुरावस्थेचे सर्वबाबी निदर्शनास आल्या. 
Loading...

शहरात डासाची उत्पत्ती रोखण्यासाठी संबंधीत विभागाकडून फवारणी होत नसल्याने रेखा जरे पाटील यांनी पहाटे थेट महापालिकेचे मलेरिया विभाग गाठले. 


महापालिकेच्या गॅरेजमध्ये असलेल्या या विभागाकडे जाण्यासाठी वाट देखील नसल्याने वाहनांच्या मधून वाट काढत या विभागाची पहाणी केली.

विभागाचे अधिकारी शितोळे व इतर कर्मचार्‍यांशी चर्चा करुन उपलब्ध असलेल्या औषधी व यंत्रसामुग्रीची त्यांनी माहिती घेतली. कर्मचार्‍यांनी देखील गैरसोयीचा पाडा वाचला. 

शहराच्या हद्दीसाठी अवघे 15 कर्मचारी असून, एका ठिकाणी पंधरा ते वीस दिवसांनी फवारणी होत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. खराब झालेले फॉगिंगच्या जुन्या मशीनी दुरुस्तीकरिता पुण्यालाच पडून आहे. 


तर नव्याने आनलेली मोठी फॉगिंग मशीनसाठी टेम्पोच उपलब्ध नसल्याने ते देखील बंद अवस्थेतच असल्याचे निदर्शनास आले. 

मागील वर्षी पावसाळ्यात साथीच्या आजाराने काही नागरिक दगावले असता, यावर्षी देखील महापालिकेचा नियोजन शुन्य कारभार राष्ट्रवादीने चव्हाट्यावर आनला आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. 

पावसाळा सुरु होवून महिना उलटत आला तरी साथीच्या आजारांवर उपायोजनात्मक कारवाई महापालिकेकडून करण्यात आलेली नाही. 


मलेरिया विभागाची मोठी दुरावस्था झालेली असून, लावलेल्या वाहनांमुळे तेथे जाण्यासाठी रस्ता देखील नाही. छतावरील पत्र्यांना भगदडे पडले असताना पावसाळ्यात येथे कर्मचार्‍यांना थांबणे देखील अशक्य आहे. 

अशा दयनीय अवस्थेत असलेला हा विभाग नगरकरांचे आरोग्य कसे सांभाळणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

डासांची उत्पत्ती होवू नये यासाठी दर सात ते दहा दिवसाला फवारणी आवश्यक असून, शहरात वेळेवर फवारणी होत नाही. तेथे गेल्यावर कर्मचार्‍यांनी धुळीने माखलेले औषधांचे बॉक्स फोडले आहे. 

नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र देखील या विभागात उपलब्ध नाही. या विभागाचा नियोजनशुन्य कारभार चालू असल्याने शहरात साथीचे आजार पसरुन नगरकरांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याची भावना रेखा जरे पाटील यांनी व्यक्त केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.