अण्णा हजारेंच्या मध्यस्थीने पालखी सोहळ्याच्या वादावर तोडगा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- टाकळी ढोकेश्वर पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील निळोबाराय देवस्थान ट्रस्ट व सोपानकाका औटी यांच्यातील आषाढी दिंडीचा वाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत रविवारी संत यादवबाबा मंदिरात झालेल्या बैठकीत मिटला. 
Loading...

सोपानकाका हे त्यांची दिंडी पारनेर येथून काढतील. पिंपळनेर येथे येऊन निळोबाराय महाराजांचे दर्शन घेऊन ते त्यांच्या ठरलेल्या मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करतील. निळोबाराय देवस्थान ट्रस्टचा पालखी सोहळा ठरलेल्या मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करेल, या हजारे यांच्या प्रस्तावावर सर्वांचे एकमत झाल्याने हा वाद मिटला. 


यावेळी निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष अशोक सावंत, सुरेश पठारे, भाऊसाहेब लंटाबळे, रामदास रासकर, गोपाळकाका मकाशिर, राजेंद्र पठारे, बाळासाहेब सावंत, वसंत गाजरे व पिंपळनेर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.