प्रसाद शुगरच्या गाळप झालेल्या उसाचे उर्वरित पेमेंट पोळा सणाला देणार - प्राजक्त तनपुरे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  प्रसाद शुगरच्या मागील गळीत हंगामात फेब्रुवारी मार्च 2018 मध्ये गाळप झालेल्या तीन पंधरवाड्याचे पेमेंट उसास साखरेचे भाव कमी झाल्या मुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना 1800 रूपये प्रती टना प्रमाणे पेमेंट देण्यात आले होते.त्या शेतकऱ्यांना 100 रुपये टना प्रमाणे पेमेंट पोळा सणाला देण्यात येईल.व उर्वरित रक्कम दसऱ्याचे दरम्यान देण्याचा मानस असल्याची माहिती प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे ह्यांनी पत्रकार परिषदेत दिली.


श्री तनपुरे ह्यावेळी म्हणाले की प्रसाद शुगरने गत गळीत हंगामात 4लाख 17 हजार टन उसाचे गाळप केले होते.त्यावेळी साखरेचे भाव 3500 रूपये क्विंटल भाव असल्याने कारखान्याने 2300 प्रति टन भाव जाहिर करून त्या प्रमाणे गाळपास आलेल्या उसास 2300 रूपये भाव दिला होता.त्यानंतर साखरेचे भाव कमी कमी होउ लागल्याने त्याचा परिणाम उस भावावर होऊन प्रसाद शुगरच्या उस उत्पादक शेतकऱ्यांना फेब्रुवारी च्या पहिल्या पंधरवाड्यात 1800 रूपये प्रती टना प्रमाणे पेमेंट देण्यात येईल असे सांगितले होते.

त्यावेळी प्रशासनाने जेव्हा साखरेचे भाव वाढतील त्यावेळी कारखाना सदरील उस उत्पादकाना जाहीर केलेल्या भावा प्रमाणे पेमेंट देण्याचे जो शब्द दिला होता.त्या शब्दा प्रमाणे आज 1800 रूपये पेमेंट दिलेल्या उस उत्पादकाना 100 रूपये प्रती टना प्रमाणे पोळा सणासाठी वर्ग करण्यात येतील. उर्वरित पेमेंटची रक्कम कारखान्याच्या गळीत हंगाम सुरु होण्या पूर्वी किंवा दसऱ्याचे दिवशी देण्यात येईल.असे श्री तनपुरे ह्यांनी सांगितले.
प्रसाद शुगर येत्या गळीत हंगामात 8 लाख टन उस गाळपाचे उदिष्ट असून कारखाना यावेळी 4200 टना प्रमाणे गाळप करणार असून कारखान्याचे विस्तारीकरणाचे करण्याचे काम पूर्ण होत आले असून येत्या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचे दृष्टीने ऊस तोडणी मजुरांची भरती सुरु करण्यात आली आहे दररोज 5000 टना प्रमाणे गाळप व्हावे त्यासाठी उस तोडणी मजुराना आगाउ उचल देण्यात येत आहे.

कारखान्याचे 8लाख ऊस गाळपाचे उदिष्ट समोर ठेऊन कार्यक्षेत्रात तसेच कार्यक्षेत्रा बाहेर उसाचे नोंदी घेण्याचे काम सुरु आहे.तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या नोंदी प्रसाद शुगरकड़े करण्याचे आवाहन श्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी केले आहे.यावेळी उस गाळपाचे नियोजन करण्यात आले असून नोंदी प्रमाणे उसाचे गाळप करण्यात येणार असून त्यात कोणाचाहि हस्तक्षेप होणार नसल्याचे सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.