कर्जत तालुक्यात टेम्पो उलटल्याने एकजण ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील राशीन परिसरात करपडीफाट्याजवळ बारामतीवरून येणारा मालवाहू टेम्पो उलटल्याने चालक जागीच ठार झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बारामती येथून कर्जतकडे येत असलेल्या रिकामा टेम्पो करपडी फाट्याजवळ उलटल्याने यामधील चालक संजय प्रकाश मोदी (शहाजीनगर, कर्जत) हे जागीच ठार झाले. याबाबत राजेश प्रकाश मोदी यांनी दिलेल्या खबरीवरून कर्जत पेालिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हेड कॉ. एम.आर. गाडे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.