कंटेनरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यात कंटेनरची धडक बसल्याने मोटरसायकलवरील विद्यार्थ्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. नगर-मनमाड राज्य मार्गावरील राहुरीच्या मुळा नदी पुलाजवळ भीषण अपघाताची घटना घडली.


Loading...
मयूर लक्ष्मण गोरड (वय १८, रा. राहुरी खुर्द) हा महाविद्यालयीन विद्यार्थी घराकडे जात असताना मुळा नदी पुलाजवळ आल्यानंतर नगरकडून मनमाडच्या दिशेला चाललेल्या आर.जे. २५ जे.ए. ३१८९ हा कंटेनर विरूध्द दिशेला घुसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना समोरून आलेली मयूरची मोटरसायकल कंटेनरला धडकली. 

गंभीर जखमी झालेल्या मयूरला उपचारार्थ नगरच्या खाजगी दवाखान्यात हलविण्यास मदत केली; मात्र रस्त्यातच मयूरचा मृत्यू झाला. राहुरी येथे शवविच्छेदनानंतर मयूरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने राहुरी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.