भरपूर पाऊस पडू दे आ.शिवाजी कर्डिलेंचे पांडुरंगाला साकडे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यात भरपूर पाऊस पडू दे व बळीराजाला सुखी होऊ दे, अशा स्वरुपाची प्रार्थना पंढरीच्या पांडुरंगास राहुरी- नगर -पाथर्डीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या पांडुरंगाचे आ. कर्डिले यांनी सपत्नीक दर्शन घेतले. या वेळी सौ. अलकाताई कर्डिले, युवानेते अक्षय कर्डिले उपस्थित होते. 


Loading...
महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे व माझा शेतकरीराजा सुखी होऊ दे , अशी मागणी करत पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुखाचा व आरोग्यदायी होऊ दे,अशा स्वरुपाची प्रार्थना आ. कर्डिले यांनी या वेळी केली. 

नगर जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या अनेक दिंडयांचे आ. कर्डिले यांनी ठिकठिकाणी थांबून स्वागत केले तसेच वारकऱ्यांची विचारपूसही केली. आमदार शिवाज़ीराव कर्डिले हे दरवर्षी आषाढी वारीनिमित पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.