राजीनामा दिलाच नाही, दोषींवर गुन्हे दाखल करा - श्रीपाद छिंदम


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नसून महापौर सुरेखा कदम, त्यांचे पती संभाजी कदम व तत्कालीन आयुक्त घनश्याम मंगळे यांनी खोटा राजीनामा सादर करुन मंजूर केला असून याची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे नगरसेवक श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिस ठाण्यात केली आहे. 

Loading...
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मनपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने या प्रकरणानंतर एक ते दोन महिने तुरुंगात असताना उपमहापौर पदाचा राजीनामा मी दिलाच नसल्याचे म्हणत महापौर सुरेखा कदम, त्यांचे पती संभाजी कदम व तत्कालीन आयुक्त घनश्याम मंगळे यांनी संगनमताने बोगस राजीनामा तयार करुन मंजूर केला असल्याचा आरोप श्रीपाद छिंदम याने पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जात केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात तसा अर्ज दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.