प्लास्टिक बंदीमुळे जिल्हाधिकार्‍यांचे स्वागत पडले महागात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रेव्हेन्यू सोसायटीची सर्वसाधरण सभेत रेव्हेन्यू सोसायटीकडून जिल्हाधिकारी यांचे लॅस्टिकचे वेस्टन असलेल्या पुष्पगुच्छाने स्वागत करताच, जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्लॅस्टिक बंदीचा भंग केल्याच्या कारणावरून रेव्हेन्यू सोसायटीला 5 हजारांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

Loading...
त्यामुळे सोसायटीचे पदाधिकारी, सभासद गोंधळून गेले. मात्र, काही काळातच चुकी लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत करीत टाळ्यांच्या गजराने स्वागत केले. शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या रेव्हेन्यू सोसायटीची 97 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात पार पडली. 

रेव्हेन्यू सोसायटीचे 145 सभासद उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्या अध्यक्षतेखाली अपर जिल्हाधिकारी पालवे यांच्या उपस्थितीत ही सभा सकाळी 11 वाजता सुरु झाली. द्विवेदी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत येताच सोसायटीच्या पदाधिकारी, संचालक पुष्पगुच्छ देण्यासाठी मंचावर आले. 

त्यावेळी पुष्पगुच्छ शाल देऊन जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करीत असताना पुष्पगुच्छाला असलेल्या प्लॅस्टिककडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष गेले असता, जिल्हाधिकारी म्हणाले, प्लॅस्टिक बंदी असताना प्लॅस्टिकचा वापर करणे गैर आहे. प्लॅस्टिक बंदी नियमाचे उल्लंघन झाले आहे. 

ही बाब सोसायटीला शोभादायक नाही. असे सांगत रेव्हून्यू सोसायटीला 5 हजारांचा दंड ठोठावला असून, तो भरण्याचा आदेश दिला आहे. ही चुकीची बाब पदाधिकारी, सभासदांना लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेला दाद दिली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.