तहसीलदारांनी जप्त केलेला डंपर वाळूतस्करांनी पळविला !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गोदावरी नदीपात्रातून बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर तहसीलदारांनी जप्त करून कोपरगाव एसटी आगारात लावलेला होता. तो काल (ता. १) मध्यरात्री ३.३० ते ४ वाजेच्‍या दरम्‍यान  कारमधून आलेल्‍या चार जणांच्‍या टोळक्‍याने वॉचमनला फसवून पळवुन नेल्‍याची तक्रार आगाराच्‍या वॉचमनने कोपरगाव शहर पोलिसात दिली आहे. 


Loading...
या प्रकरणी ४ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. . विना परवाना बेकायदा वाहतूक करणारा डंपर (क्र. एमएच ०४ जीएफ ९५६९) कारमधील चार अनोळखी इसमांनी आगाराच्‍या आवारातून पळवून नेला, अशी फिर्याद वॉचमन नारायण बाबुराव गायकवाड (वय ५२, रा. येसगाव) यांनी दिली आहे. 

यावरून गु.र.नं. फस्‍ट १३१/ २०१८ नुसार भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्‍हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहा. फौजदार आर. बी. भालेराव करीत आहेत. . शहरासह तालुक्‍यात अनेक वाळूतस्कर सक्रिय असतानाच वाळूतस्करांनी वाळूचे डंपर पळवून नेण्याच्या धक्कादायक प्रकाराने कहरच केला आहे. 


यातून वाळूतस्करांची मुजोरी उघड झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असला, तरी शहराच्‍या मध्यवर्ती असलेल्‍या व रात्रंदिवस जागता असताना बस आगारातुन पळवुन नेणाऱ्या मुजोर वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.