माजी आमदार राठोड यांनी आत्मपरिक्षण करावे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या समर्थनार्थ गेल्या दोन दिवसां पासून सोशल मिडीयावर तसेच रस्त्यावर उतरुन सामान्य नगरकरांनी मोहिम चालवली, त्यालाही शिवसेना उपनेते राठोड यांनी राजकीय षडयंत्र म्हणत, सामान्य नगरकरांची सामाजिक किंमत काढली, त्या राठोडांनी आधी स्वत: आत्मपरीक्षण करावे. 

राठोड हे गेली २५ वर्षे याच सामान्य नगरकरांच्या जीवावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. याच सामान्य नगरकरांच्या जीवावर आपण महापालिकेची सत्ता उपभोगत आहात, हे विसरु नये, अशी टिका राष्ट्रवादीचे बाबासाहेब गाडळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. 

Loading...
गाडळकर म्हणाले, शहरातील सामाजिक संघटना, विविध संस्था, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या समर्थनार्थ पाठिंब्याची भुमिका घेतली आहे. द्विवेदी साहेब मनपामध्ये पुर्णवेळ आयुक्तपदावर राहावेत, अशीच सामान्य नगरकरांची प्रामाणिक इच्छा आहे. यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची कुठलीही भुमिका नसून, सेनेला बदनाम करण्याच कुठलंही षडयंत्र रचण्यात आलेलं नाही, हे सर्वप्रथम राठोड यांनी समजावून घ्यावे. 

विकास हि प्रक्रिया असून, ती निरंतर चालत राहते, अस मानणाऱ्या राठोड यांनी गेल्या २५ वर्षात, नगरमध्ये केवळ विकास कामांना अडथळा व चांगले कामाला खोडा घालण्याचे काम केलेलं आहे. अतिक्रमणांवरील कारवाई असो, नदीसफाईचे काम असो किंवा एमआयडीसीमध्ये कुठलाही नवीन विकासप्रकल्प आलेला असो, राठोड यांनी फक्त आणि फक्त त्यामध्ये खोडा घालण्याचाच प्रयत्न केला आहे. 

ही गोष्ट सर्वसामान्य नगरकरही चांगलेच ओळखून आहेत. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या रुपाने अनेक वर्षानंतर नगर शहराला सक्षम अधिकारी मिळाला असून, शहरातील अनेक गंभीर समस्या ज्या आहेत, त्यात अतिक्रमणे, पार्किंग, नगरमधील बेरोजगारी, स्वच्छता, रस्ते व नागरीकांचे अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या मार्फत होत आहेत, त्याचे अनेक चांगले दुरगामी परिणाम येत्या काही काळात आपल्याला नगरमध्ये पाहायला मिळणार आहेत. 

आणि म्हणूनच नगर मधील सामान्य नागरिकांसह शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच सर्वपक्षीय राजकरण्यांनीही द्विवेदी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. वृत्तपत्र हे लोकशाहिचा चौथा स्तंभ आहे. ते समाजातील विविध प्रश्न प्रामाणिकपणे समाजासमोर मांडत असतात. 

परंतु माजीअनिल राठोड यांच्या समर्थनार्थ वृत्तपत्राने बातमी छापली की लोकशाहिचा चौथा स्तंभ आणि विरोधात छापली कि, ती पेड न्यूज असे म्हणारे माजी आमदार राठोड यांनी आत्मपरिक्षण करावे, अशी टिका गाडळकर यांनी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.