सोशल मिडियाद्वारे अफवा पसरविणाऱ्यांविरुध्द कारवाई करणार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यातील गावांमध्ये सोशल मिडियाद्वारे मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरविण्यात येत असून कोणतीही शहानिशा न करता अशा अफवा पसरविणाऱ्यां विरुध्द कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. 


Loading...
धुळे जिल्ह्यात मुले पळवण्याच्या अफवेनंतर झालेल्या पाच जणांच्या हत्येने खळबळ माजली आहे. या धर्तीवर नगर जिल्ह्यात पोलिसांनी अशा कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गावामध्ये मुले पळविणारी टोळी आली आहे, गावामध्ये दरोडा घालणारी टोळी आली आहे, अशा प्रकारच्या अफवा पसरवून जनतेमध्ये घबराट व भीती पसरवू नये. 

सोशल मिडीयावर अशा अफवामधून गावात येणारे अपरिचित लोक, साधुवेशातील लोक, किरकोळ विक्री करणारे फेरीवाले यांना विनाकारण मारहाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा मारहाणीतून कोणी व्यक्ती जखमी अगर मृत्युमुखी पडल्यास अफवा पसरविणाऱ्या इसमांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं या पत्रकात म्हटलं आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.