श्रीगोंद्यात दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा पोलिसांनी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव फाट्यानजीक श्रीगोंदा पोलिस गस्तीवर असताना दौंड नगर रस्त्यावर वाहने अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले. 

तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.पकडलेल्या आरोपींकडून माहिती घेऊन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पकडलेल्या आरोपींकडून एक तलवार, नायलॉन दोरी, मिरची पूड, एकदुचाकी असा २०,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे, पोलीस कर्मचारी उत्तम राऊत, प्रकाश वाघ, दादा टाके, वैराळ आदी शनिवारी मध्यरात्री श्रीगोंदा कारखाना, मढेवडगाव भागात गस्त घालत होते. 

Loading...
हे पथक मढेवडगावहून शिरसगावाकडे जात असताना ते शिरसगावफाट्यानजिक बस थांब्याच्या आडोशाला कुणीतरी असल्याचा पोलिसांना संशय आल्यामुळे पोलीस कर्मचारी प्रकाश वाघ यांनी त्या दिशेने बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता त्याठिकाणी पाचजण दबा धरून बसलेले आढळले.त्यांच्या समोर दोन दुचाकी देखील होत्या. 

त्यातील दोघेजण त्यांच्या हातात काहीतरी लपवत होते. पोलिसांना पाहून ते सर्वजण पळून जाऊ लागले पोलिसांनी पाठलाग करत त्यातील तिघांजनांना पकडले. पळून जात असताना यातील काहीजण किरकोळ जखमी झाले. 

दोघेजण मात्र एका दुचाकीवर बसून पळून जाण्यात यशस्वी झाले पकडलेल्या तिघांकडे चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे महेंद्र बाजीराव महारनोर रा.वांगदरी, मनोज प्रकाश निंबाळकर (रा.गणेगाव दुमाला, ता.शिरूर), अभिजित जयसिंग शितोळे (रा.गणेगाव दुमाला, ता. शिरूर) अशी असल्याची समजली.

तर पळून गेलेल्या दोघांची या पकडलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता. काष्टी येथील अशोक नावाचा इसम (पूर्ण नाव माहीत नाही) व त्याचा एक अनोळखी साथीदार (नाव गाव माहीत नाही). 

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी दौंड नगर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर दरोडा टाकण्यासाठी दबा धरून बसलो होतो. त्यामुळे पोलीस कॉ प्रकाश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या सर्व आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.