टेम्पो-सायकल अपघातात पत्नी ठार, पती गंभीर जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सायकलवरुन जाणाऱ्या पती- पतीस पाठीमागून येणाऱ्या आयशर कंपनीच्या टेम्पोने सायकलला दिलेल्या जोराच्या धडकेत सायकलवरील दाम्पत्यापैकी पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना साकुरी येथे राहाता पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. 


Loading...
रविवारी (दि. १) सायकांळी पाच वाजेच्या सुमारास साकुरी येथील ज्ञानेश्वर पवार (वय ५५) व त्यांच्या पत्नी लहानुबाई (वय ५०) हे संध्याकाळी कामवरुन घरी जात होते. यावेळी साकुरी हद्दीत नगर- मनमाड महामार्गावर मुथा फर्निचरसमोर मागून येणाऱ्या आयशर कंपनीच्या चेसी बॉडीने त्यांना जोराची धडक दिली. 

यात लहानुबाई या जागेवर मयत झाल्या तर त्यांचे पती ज्ञानेश्वर पवार हे गंभीर जखमी झाले.घटनेनंतर वाहनचालक अनियाज चौहान (वय ५०, रा. इंदौर, मध्यप्रदेश) याला नागरीकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याचे समजते. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे समजते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.