पांगरमल दारूकांड प्रकरणी दोन पोलिस कर्मचारी बडतर्फ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यभर गाजलेल्या पांगरमल दारूकांड प्रकरणी पोलिस कर्मचारी जितेंद्र गायकवाड व शब्बीर शेख या दोघांना पोलिस खात्यातून बडतर्फ केल्याची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केली आहे. पांगरमल घटनेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशीत पोलिस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपींसोबत विशेष स्नेह ठेवल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. 


Loading...
या विषारी दारूकांडात पांगरमल येथील ९ व इतर ठिकाणचे ५ अशी एकूण १४ जण मयत झाले होते.. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पांगरमल दारूकांड प्रकरणातील आरोपीसोबत पोलिस कर्मचारी जितेंद्र गायकवाड व तोफखाना पोलिस ठाण्यातील कर्मचारी शब्बीर शेख यांचे असंख्य कॉल झाले होते. 

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये विषारी दारूची निर्मिती करणाऱ्या आरोपींसोबत पोलिसांचे संबंध असल्याचा आरोप होत होता. त्यावरून काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्यावरून श्रीरामपूरच्या अपर पोलिस अधीक्षकांनी सखोल चौकशी करून काही महिन्यांपूर्वी पोलिस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. 


त्यावरून दोन कर्मचाऱ्यांना पोलिस खात्यातून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना पंधरा दिवसात म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे मुदतवाढ घेत त्यांनी म्हणणे सादर केल्यानंतर पोलिस अधीक्षक शर्मा यांनी गायकवाड व शेख या दोघांविरुद्ध शनिवारी सायंकाळी बडतर्फीची केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------Powered by Blogger.