राजकारणात विष कालवणाऱ्यांना जनता कधीच थारा देत नाही - आ.बाळासाहेब थोरात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याला नाव ठेवण्याची कुणात हिम्मत नाही, मात्र काही विघ्नसंतोषी लोक द्वेषभावनेतून तालुक्यात विष कालवत आहे. अशांना वेळीच जाब विचारण्याची आवश्यकता आहे. तालुक्याच्या आणि सहकाराच्या राजकारणात विष कालवणाऱ्यांना येथील जनता कधीच थारा देत नाही, असे सांगत आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर टीकास्र सोडले. 

थोरात कारखान्याच्या वतीने रविवारी शेडगाव येथे ऊस विकास मेळावा झाला. यावेळी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी माधव कानवडे होते. कृषिभूषण संजीव माने, शंकर खेमनर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यावेळी उपस्थित होते. Loading...
थोरात म्हणाले, आमच्या कारखान्याचा कारभार पारदर्शक आहे. त्यामुळे कारखान्याकडे कुणीही बोट करत नाही. राज्यात येथील कारभाराचे कौतुक होते. ज्यांचा जनतेशी फारसा संबध येत नाही, असे लोक खोटेनाटे बाेलून विष कालवत आहेत. कारखाना तालुक्याच्या विकासाचे हृदय आहे. ते जर मोडकळीस आले, तर यांना तुलना करायला कोणीच राहणार नाही. त्यामुळे ते कारखाना मोडण्याचा डाव टाकत आहेत. 

कारखाना आणि येथील सहकार थेट प्रपंच आणि भाकरीशी निगडीत असल्याने जनता त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. कोणीही येतो आणि मेळावे घेतो. अशा विष कालवणाऱ्यांना वेळीच रोखा. पुढील पन्नास वर्षांचे नियोजन करुन साडेपाच हजार मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना आणि तीस मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प कमी खर्चात आणि कमी कालावधीत सुरु झाला आहे. 


मन शुध्द आणि हेतू चांगला असल्याने परमेश्वराचेही आशीर्वाद कायम मिळत आले. कारखान्याच्या कामात कधीही राजकारण आणले नाही, भेदाभेद केला नाही. २३०० रुपयांप्रमाणे सर्व ऊस उत्पादकांना पेमेंट वेळेत दिले. कामगारांनादेखील पगार वेळेवर दिले जातात. इतर कारखान्यांनी ते दिले का, हे पडताळून बघण्याचा सल्ला त्यांनी दिला. 


कमी श्रमात जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी ठिंबक सिंचनचा वापर करत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चौदा लाख टन ऊस उत्पादन करण्याचे आवाहन त्यांंनी केले. संगमनेर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक, तर नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. 


त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिलेत का? 

संगमनेरच्या सहकारातून अनेक माणसे मोठी झाली. यातील काही नतदृष्ट लोकच टीका करतात हे अत्यंत वाईट आहे. भाऊसाहेब थोरात यांनी सामान्य शेतकरी, ऊस उत्पादकांना केंद्रबिंदू मानून विकासाचे धोरण राबविले. साखरेचे भाव कमी झाले असतानाही एफआरपीपेक्षा दोनशे रुपये अधिक भाव दिला. कारखान्याविषयी बोलणाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिलेत हे तपासावे. माधव कानवडे, अध्यक्ष थोरात कारखाना. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.