विकासाची कामे केल्याने मला निवडणुकीची काही चिंता नाही - खा. गांधी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मतदारसंघातील विकासाची कामे केल्याने मला निवडणुकीची काही चिंता नाही. मतदार योग्यवेळी योग्य निर्णय घेतील, आपण मतदारसंघातील उर्वरित विकासाची कामे लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही, खा. दिलीप गांधी यांनी दिली.रातंजण येथे खा. गांधी यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या नवीन सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आज दि.16 रोजी खा. गांधी यांच्या हस्ते पार पडला, या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

खा. गांधी पुढे म्हणाले, रातंजण गावाच्या सवांगीण विकासाकरिता आपण कटिबद्ध असून, येथील उर्वरित रस्त्याचे कामदेखील मार्गी लावणार असून, पाणी फिल्टर आरो मशीन लवकरच आपण देणार आहोत. जेणेकरून येथील जनतेला पिण्याकरिता स्वच्छ पाणी मिळेल. Loading...
विकासाची कामे सातत्याने करत असताना मला माझ्या मतदारांवर विश्वास आहे. या पाठबळामुळेच मी खासदार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी राऊत, खेडकर, बुध्दिवंत आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन ग्रामसेवक अमित कोल्हे यांनी केले. भाऊसाहेब खोटे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, पं. स. उपसभापती प्रशांत बुध्दिवंत, उपसरपंच अमृत लिंगडे, सचिन झांबरे, हरिदास केदारी, प्रभाकर घोडेस्वार, बाळासाहेब जगदाळे, कृषी अधिकारी जाधव, राऊत, बागुल रावसाहेब, ज्ञानदेव लष्करे, जयदीप काळे, भाऊसाहेब खोटे, दीपक पाचारणे, विलास काळे, सदाशिव काळे, डॉ.रामचंद्र धस, कालिदास सकट, अंकुश काळे, जालिंदर सकट, मनोहर कणसे, दादा बांदल, कल्याण कणसे, अशोक कणसे, मारुती भिसे, संगीता माने, सुनीता खोटे, सुमिता कणसे, ताई झांबरे, अनुष्का झांबरे, बापू काळे, दादा खेडकर, बापू कणसे, विनायक फरताडे आदींसह महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.