विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांना कोठडी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे विवाहितेच्या मृत्यूनंतर कडू कुटुंबातील पाचजणांना अटक करण्यात आली होती. त्यांना काल राहाता न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठही देण्यात आली. दरम्यान, लग्न समारंभात दिलेल्या सर्व वस्तू कांचनच्या माहेरील नातलगांनी घरातून पोलीस बंदोबस्तात काढून गुहा येथील अनाथ आश्रमात दान केल्या. 

पाथरे येथील कांचन राकेश कडू (वय २३) या विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर तिचे हत्येस जबाबदार धरून किरण चांगदेव कदम यांच्या फिर्यादीवरून पती राकेश रामदास कडू, सासू विजया, सासरा रामदास आसाराम कडू, दीर विरेश, रविराज, जाव ज्योती रविराज कडू (सर्व रा. पाथरे ता. राहता) यांच्याविरोधात लोणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. Loading...
अंत्ययात्रेपूर्वीच लोणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यास प्रारंभ केला. कांचनचा अंत्यविधीचे सोपस्कार तिच्या माहेरच्या मंडळींनी पार पडले. यावेळी तिच्या सासरकडील कुटुंबातील एकही व्यक्ती अंत्यविधीस उपस्थित नव्हती. काल वरील पाचही आरोपींना राहाता न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. यातील दीर विरेश व जाव ज्योती हे दोघे घटनेनंतर पसार झाले आहेत.त्यांचा लोणी पोलीस शोध घेत आहेत. 

काल राखेच्या कार्यक्रमावेळी मयत कांचनच्या भावाने हंबरडा फोडून माझ्या बहिणीला न्याय देण्याची मागणी करीत टाहो फोडला.राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द (भेडार्पूर) येथील चांगदेव गोविंद कदम यांची मुलगी कांचन (वय २३) हिचा विवाह राहाता तालुक्यातील पाथरे बु. येथील रामदास परशराम कडू यांचा मुलगा राकेश याच्याबरोबर २३ एप्रिल २०१७ रोजी झाला होता. 


मात्र, कांचनच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी घटनेला अवघा एक दिवस उलटल्यानंतर काल पाथरे येथे कांचनच्या घरचे सर्व नातेवाईक अचानक येऊन थांबले. तत्पूर्वी लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व भालचंद्र शिंदे हे फौजफाट्यासह दाखल झाले होते. पोलीस का येऊन थांबली हे कुणासही समजत नव्हते. 


दरम्यान, भेर्डापूरहून कांचांचे नातेवाईक आले व त्यांनी बंगल्यात जाऊन लग्न समारंभात दिलेले फ्रिज, कपाट, सोफा, डायनिंग टेबल यांसह अनेक संसारोपयोगी वस्तू पोलीस बंदोबस्तात घरातून काढल्या. आणि थेट त्या गुहा (ता. राहुरी) येथील अनाथ आश्रमात दान करून टाकल्या.दरम्यान, लोणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.