लष्करी जवानाविरोधात बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जवळचा नातेवाईक असलेल्या युवकाने लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला, कुंकवाचा कार्यक्रम करून विवाहाला नकार दिल्याने संबंधित युवतीने घारगाव पोलीस ठाण्यात एका लष्करी जवानाविरोधात बलात्कार व फसवणुकीची फिर्याद दिली. 

Loading...
बबन बाळू औटी ( रा. आभाळवाडी, ता. संगमनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्‍यातील एका गावातील युवतीचे जवळचा नातेवाईक असलेल्या युवकाशी सुमारे तीन वर्षांपूर्वी कौटूंबिक नातेसंबंधातून प्रेम जुळले. 

कुटूंबातील असल्याने घरच्यांचीही या प्रेमविवाहाला संमती होती. बबन औटी चार वर्षांपूर्वी लष्करात भरती झालेला आहे. यानंतर वेळोवेळी सुट्टीवर आल्यावर त्याने लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी वारंवार शरीर संबंध ठेवले होते. 

3 मे 2017 रोजी यांचा आभाळवाडी येथे कुंकवाचा कार्यक्रमही झाला. पीडितेने विवाहाबाबत वारंवार विचारणा करुनही त्याने चालढकल केली. तिच्याशी लग्नाला नकार देत ड्युटीवर निघून गेला. याबाबत त्याच्या घरच्यांनीही त्याची इच्छा नाही, असे कारण देत विवाहाला नकार दिल्याने त्या युवतीने काल रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.