विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरीत शालेय विद्यार्थ्याने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सौरभ सुधाकर शिंदे (१८ वर्षे, चिंचविहिरे) असे या विद्यार्थ्याचे नाव अाहे. त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. तो दहावीत शिकत होता. 

घरात कोणी नसताना त्याने आत्महत्या केली. राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सौरभचे वडील पिठाची गिरणी चालवतात. आत्महत्येचे कारण समजले नाही.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.