श्रीगोंद्याचे पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव निलंबित


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  माजी उपमुख्यमंत्री, तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांना निलंबित करण्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार राहुल जगताप, जितेंद्र आव्हाड यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. 

कोसेगव्हाण येथील उमराव नलगे याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक जाधव यांच्याकडे तपास देण्यात आला होता. ८ जूनला मध्यरात्री आरोपी घरी आल्याची माहिती मिळताच जाधव त्याला अटक करण्यासाठी कोसेगव्हाण येथे गेले. 

Loading...

आरोपीचा भाऊ माजी उपसरपंच भीमराव नलगे यांना जाधव यांच्याकडून दमदाटी व शिवीगाळ करण्यात आली. भुजबळ यांच्याविषयी त्यांनी अपशब्द वापरले. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. बहुजन समता परिषद, तसेच विविध संघटनांनी याचा निषेध व्यक्त करत जाधव यांच्यावर कारवाई करून निलंबित करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देत श्रीगोंदे बंदची हाक देण्यात आली होती. 

नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात आमदार राहुल जगताप, जितेंद्र आव्हाड यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. अजित पवार यांनी जाधव याना निलंबित करण्याची मागणी लावून धरल्यामुळे अध्यक्ष बागडे यांनी त्यांच्या निलंबनाची घोषणा केली. निलबंन झाल्याची बातमी येताच भुजबळ समर्थकांनी श्रीगोंदे ठाण्यासमोर आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.