माजी आमदार शंकरराव गडाख यांची बदनामी केल्याने गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोशल मीडियातून माजी आमदार शंकरराव गडाख यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याने ऋषिकेश शेटे व माउली ढोकणे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक व व्हॉट्स अॅपवर गडाख यांच्याबद्दल शिवराळ भाषेत मजकूर टाकून सामाजिक व राजकीय स्वास्थ्य बिघडवण्यात आले. 


Loading...
जनतेचा उद्रेक झाल्यास या दोन व्यक्तीच त्यास जबाबदार असतील. गडाख यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोघांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडाख समर्थकांनी केली. 

गणेश कोरेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सायबर क्राईम अंतर्गत कारवाईचे आश्वासन पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी कार्यकर्त्यांना दिले. निवेदनावर अण्णाभाऊ पेचे, नगरसेवक बापूसाहेब गायके, सचिन वडागळे, राजेंद्र उंदरे, बाळासाहेब कोकणे, माउली तोडमल, अल्पेश बोरकर, असिफ पठाण, सुनील धायजे, विशाल सुरडे, नितीन ढवळे, प्रकाश सोनटक्के, वैभव नहार, नीलेश जगताप, गणेश कोरेकर, किरण घोडेकर, कचरू गडाख, किशोर ठाणगे, राहुल देहाडराय, विनायक नळकांडे, सुधीर बोरकर, तुषार जायगुडे, अक्षय जायगुडे, विलास म्हस्के, सतीश पिंपळे, आदेश टेकाळे, आकाश एरंडे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.