आयडियल सलून अँड अकॅडमीतर्फे जेंट्स हेअर कट स्पर्धा संपन्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आयडियल सलून अँड अकॅडमीतर्फे हॉटेल यश पॅलेस याठिकाणी जेंट्स हेअर कट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नगर शहरासह बीड,पुणे,औरंगाबाद येथील व्यावसायिक स्पर्धकांनीही सहभाग नोंदवला होता. 


स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे,नाभिक महामंडळाचे शांताराम राऊत, सरचिटणीस विकास मदने, नंदकुमार मोरे,शरद दळवी, आबा सैदाने,सुनील खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.यामध्ये लक्ष्मण दळवी(प्रथम ),नारायण सुर्वे(द्वितीय),विशाल वैद्य(तृतीय) हे स्पर्धक विजयी झाले.

उदघाटन प्रसंगी बोलताना आयडियल सलून अँड अकॅडमीचे संचालक महेश मोरे म्हणाले की आजच्या तरुणाईमध्ये फॅशनचे वेड आहे. त्यांना आकर्षित करू शकेल आणि त्यांच्या मागणीनुसार सेवा देणे या गोष्टी गरजेच्या आहेत.यानुसार सलून व्यावसायिकांनी व्यक्तिमत्त्वामध्ये आणि व्यवसायामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.व याचे प्रशिक्षण देणे हा या स्पर्धेमागचा उद्देश होता. 

पुढील काळात राज्यस्तरीय फॅशन व हेअर स्टाईल स्पर्धांचे आयोजन करण्याचेही नियोजन असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मनीष शिंदे,अमित वाघमारे,सचिन मोरे,हेमंत मगर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.कार्यक्रम यशस्वीततेसाठी सचिन जामदार,निखिल मर्दाने,अक्षय पवळे,अभिषेक मोरे,मयूर मगर यांनी परिश्रम घेतले.कांचन मोरे यांनी आभार मानले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.