केडगाव दुहेरी हत्याकांड - आ.जगताप व कोतकर विरुध्द पुरावा नाही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी सीआयडीने न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र का दाखल केले नाही? म्हणून सीआयडीला दिलेल्या नोटीसीनंतर सीआयडीने मंगळवारी (दि. १७) न्यायालयात म्हणणे सादर केले. त्यामध्ये आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्या विरुध्द तपासात पुरावा मिळालेला नाही असे म्हटले आहे. 

Loading...
केडगाव येथील पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संग्राम संजय कोतकर यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात कट रचणे, खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्यात पोलिसांनी दहा जणांना अटक केली. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सीआयडी, पुणे यांचेकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी सीआयडीने अटक असलेल्या दहा आरोपींपैकी आठ जणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. त्यात आ. संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांची नावे नव्हती. दोषारोपपत्रात नावे नसल्याने आ. जगताप व कोतकर यांना जामीन मंजूर झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.