आ.थोरात राष्ट्रीय कॉंग्रेसच्या समितीवर निवड


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवर कायमस्वरुपी निमंत्रीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी अशोक गहलोत यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मोठे बदल केले असून यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या कार्यकारी समितीवर जिल्ह्याचे सुपुत्र माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. या समितीमध्ये दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत, माजी केंद्रीय मंत्री पी. चिंदम्बरम, ज्योतीरादित्य शिंदे, तारीक अहमद, राजीव सातव यांसह ११ जणांचा समावेश आहे.

Loading...
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा लाभलेले आ. बाळासाहेब थोरात यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. गोरगरिब व सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते युवक यांच्याबरोबर थेट संबंध आणि राज्याच्या विविध विभागातील प्रश्­नांचा अभ्यास यामुळे त्यांचे नेतृत्त्व लोकप्रिय ठरले आहेत. राज्य मंत्रीमंडळात कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे, खार जमीन ,जलसंधारण, रोहयो, राजशिष्टाचार व महसूल या विभागांमधून उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. 

यामुळे उभ्या महाराष्ट्रात त्यांचा आदर केला जातो. स्वच्छ व कार्यक्षम प्रतिमा असलेल्या आ. थोरातांवर मागील निवडणूकांमध्ये पक्षाने प्रचाराची मोठी जबाबदारी दिली होती. ती यशस्वीपणे पार पाडताना आ.थोरात यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिले. गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. तसेच हिमाचल प्रदेशचे निरीक्षक व महाराष्ट्र विधान मंडळाच्या अभ्यास दौऱ्याचे अध्यक्षपदही त्यांनी सक्षमपणे सांभाळले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.