मुख्यमंत्र्यांना पंढरीत पाय ठेवू देणार नाही 'मराठा क्रांती मोर्चा'चा इशारा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आषाढी एकादशीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका जाहीर करावी, अन्यथा श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पंढरीत पाय ठेवू देणार नाही, असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. 


Loading...
या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा समाजातील विविध पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांची पंढरपूरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेपासून रोखण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समाजाने सनदशील मार्गाने मोर्चांसह नानाविध प्रकारची आंदोलने केली; पण एकही मागणी शासनाने पूर्ण केली नाही. 

केवळ आश्वासनाची बोळवण केली. म्हणून मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे.येत्या २३ जुलैला आषाढी एकादशी आहे. एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.