नगर- मनमाड राज्य मार्गावर वाहनाच्या धडकेत महिला ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर- मनमाड राज्य मार्गावर कोल्हार येथे देवकर वस्तीनजीक काल पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. कोल्हार येथे नगर- मनमाड रस्त्यालगत देवकर फाट्यानजीक बाभळेश्वर येथील नजीर रज्जाक सय्यद यांना महिलेचा मृतदेह रस्त्यात पडलेला दिसला. 


Loading...
त्यांनी लोणी पोलिसांना याबाबत कळविले. लोणी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. महिलेच्या अंगावरून अनेक वाहने गेल्याचे जाणवत होते. याबाबत लोणी पोलीस महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत असून सहाय्यक फौजदार फटांगरे घटनेचा तपास करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.