श्रीगोंद्यात जिल्हा बँक लुटण्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी जेरबंद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दि. १४ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या घोगरगावच्या शाखेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला, शनिवारी दि.१४ रोजी श्रीगोंदा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नगर सोलापूर रस्त्यावर मांडवगण शिवारातून जेरबंद केले. यातील पाचजण ताब्यात घेतले तर एकजण पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या पकडलेल्या दरोडेखोरांकडून एक धारदार चाकू, मिरची पूड, हेक्सा ब्लेड, लोखंडी पाईप, कटावणी आदी साहित्य जप्त केले आहे.. याबाबत सविस्तर असे की, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार मांडवगण शिवारात संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.


त्यामुळे पोवार यांनी सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे, पो.कॉ.प्रकाश वाघ, दादा टाके, उत्तम राऊत, अमोल कोतकर, किरण जाधव, बोराडे, महिला कर्मचारी शीतल काळे, अविंदा जाधव, राजश्री चोपडे आदी या परिसरात रवाना झाले. त्याचवेळी सहायक पोलिस निरीक्षक कांबळे यांनी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती दिली. Loading...
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे स.पोनि देशमाने, पो.कॉ.कारखीले, बर्डे, हिंगडे, बनकर हे पथक मांडवगण शिवारात पोहोचले. नगर सोलापूर रस्त्यावर श्रीगोंदा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक असे स्वतंत्र गस्त घालत असताना, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रघुनाथ घोडके यांच्या शेताजवळ काहीजन दबा धरून बसल्याचे दिसले. 

पो.कॉ टाके यांनी त्यांच्या दिशेने बॅटेरीचा उजेड लावून पाहिले असता, सहाजण दबा धरून बसल्याचे दिसल्यामुळे गुन्हे शाखा व श्रीगोंदा पोलीस त्यांच्या दिशेने आल्याचे पाहून ते पळू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करत यातील पाच जणांना पकडले. तर एकजण मात्र अंधारात पळून गेला. 


त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी रावसाहेब बासऱ्या काळे रा. कोंभळी ता.कर्जत, बापू राजेकर ऊर्फ काळ्या काळे रा.रमजान चिंचोली, ता.कर्जत, डुपक्या कुंडलिक भोसले थेरगाव,ता.कर्जत , दुईशेर मिनीनाथ भोसले, थेरगाव,ता.कर्जत, रोहिदास नेहऱ्या काळे,रा.घुमरी ता.कर्जत असे तर पळून गेलेला नाझ्या नेहऱ्या काळे रा.घुमरी ता.कर्जत असे असल्याचे सांगितले.


त्यांची आंगझडती घेतली असता त्यांच्याकडून मिरची पूड, कटावणी, लोखंडी पाईप, चाकू, हेक्सा ब्लेड असे दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी जिल्हा बँकेच्या घोगरगाव शाखेवर दरोडा टाकण्याचा डाव असल्याचे सांगितले.पो.कॉ.प्रकाश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.