प्रसुतिदरम्यात अतिरक्तस्राव झाल्याने महिलेचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता ग्रामिण रुगणालयात प्रसूतिसाठी दाखल झालेल्या महिलेचा प्रसूतिदरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी वेळेवर न आल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला असून दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.


Loading...
तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मयत महिलेच्या नातेवाईकांनी घेतल्याने राहाता पोलिसांसमोर पेच निर्माण झाला.याबाबत सविस्तर वृत्त असे की, अस्तगाव (ता.राहाता) येथील कांचन संदीप कसबे (वय २१) ही महिला शनिवारी (दि.१४) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहाता ग्रामिण रूग्णालयात प्रसूतिसाठी दाखल झाली. रात्री १ वाजून ४० मिनिटांनी सदर महिलेची प्रसूति झाली. 

तिने मुलाला जन्म दिला. यावेळी येथे एक परिचारिका व एक महिला सफाई कामगार उपस्थित होत्या. प्रसुतिनंतर अतिरक्तस्राव सुरु झाल्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. परंतु, ते वेळेवर आले नसल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.