लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारी,अत्याधुनिक कंट्रोल व बॅलेट युनिट लवकरच जिल्ह्यात दाखल !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक एम थ्री पद्धतीच्या, १२ हजार बॅलेट व कंट्रोल युनिट मशीन जिल्ह्यात लवकरच दाखल होणार आहेत. निवडणूक आयोगाने येत्या लोकसभा निवडणुकी साठी अत्याधुनिक इव्हीएम मशीन मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या अत्याधुनिक यंत्राला व्हीव्हीपॅट मशीन जोडता येणार आहे. यामुळे कोणत्या उमेदवाराला मत दिले हे चिठ्ठीद्वारे कळणार आहे. 

पुढील आठवड्यात ही मतदान यंत्रे बंगळुरू येथून नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यात एकूण ३ हजार ५९९ मतदान केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर अत्याधुनिक मशीन उपलब्ध होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात ही मतदान यंत्रे देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. त्यात नगर जिल्ह्याचा समावेश राहणार आहे. 
Loading...

टप्प्याटप्प्याने या मशीन जिल्ह्याला पुरविण्यात येणार आहेत. केडगाव, राहुरी विद्यापीठ येथील गोडाऊनमध्ये या मशीन पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. एका कंट्रोल युनिटला एकाचवेळी २४ बॅलेट मशीन जोडता येत आहेत. पूर्वी केवळ चार बॅलेट युनिट बसविता येत होती. 

त्यामुळे एका मतदारसंघात साडेतीनशेपेक्षा उमेदवार रिंगणात राहिले, तरी हे एकच मशीन पुरेसे ठरणार आहे. अत्याधुनिक मतदान यंत्रामुळे भविष्यात मतदान प्रक्रियेवर आरोप होणार नाहीत. नगर जिल्ह्यात लोकसभेसाठी नगर, शिर्डी असे दोन मतदार संघ असून, ३२ लाखांहून अधिक मतदार आहेत. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.