भिडे गुरुजींचा वारकरी सांप्रदायाकडून निषेध.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पूर्ण जगाला आध्यात्म आणि परमार्थाचा संदेश देणारे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि श्री संत माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू संस्कृती श्रेष्ठ, असे विधान करणाऱ्या मनुवादी भिडे गुरुजींचा वारकरी सांप्रदायाकडून जाहीर निषेध व्यक्त करत असल्याचे राष्ट्रीय संत बद्रिनाथ महाराज तनपुरे यांनी म्हटले आहे.गेल्या दहा वषांर्पासून वैजूबाभूळगाव, ता. पाथर्डी येथून निघालेल्या राष्ट्रसंत तनपुरे बाबा पायी दिंडीचे श्रीक्षेत्र दगडवाडी येथे आगमन झाल्यानंतर या दिंडीचे बद्रिनाथ महाराजांनी स्वागत केले. 

या वेळी महादेव महाराज वांढेकर, कारभारी महाराज जरे, जि.प. सदस्य अनिल कराळे, शिवसेना तालुकाप्रमुख रफीक शेख, सौ. सत्यभामा तनपुरे, शेतकरी संघटनेचे नेते साईनाथ घोरपडे, सरपंच अरुण शिंदे, आरपीआयचे नेते महेश अंगारखे, उपसरपंच साहेबराव शिंदे, माजी सरपंच बापूसाहेब शिंदे, राजेंद्र पाचे, प्रा. परशुराम घोरपडे, बाळासाहेब कोलते, भाऊसाहेब मराठे, बबनराव गुंजाळ, बबन शिंदे, युवानेते सचिन शिंदे, डॉ. संपत शिंदे, भागवत शिंदे, अनिल भवार, आदी उपस्थित होते. 

Loading...

प्रकाश शिंदे यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. या वेळी दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा देताना तनपुरे महाराज म्हणाले, स्वयंघोषित भिडे गुरुजींनी दुसऱ्याचा आदर करताना इतरांचा अनादर करण्याचे काहीच कारण नाही. ज्यांच्या शिकवणीवर आज संपूर्ण जग मार्गक्रमण करतयं, त्यांचं श्रेष्ठत्व कमी करण्याचा यांना कोणी अधिकार दिला, अशा प्रवृतींचा तुकोबा -ज्ञानोबांचे पाईक म्हणून आम्ही वारकरी सांप्रदायाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत असल्याचे बद्रिनाथ महाराज यांनी स्पष्ट केले. 


देता आलं तर समाजाला चांगलं द्या, काहीही व्यक्तव्य करून समाजाची दिशाभूल करण्याचे काम कोणीही करू नये, अशा शब्दांत तनपुरे महाराजांनी भिडे गुरूजींच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. संत तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय यांच्याबद्दल केलेल्या व्यक्तव्याचा वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तनपुरे बाबा दिंडीचे करंजी येथे छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडू अकोलकर यांच्या वतीने चहा व नाश्ता देऊन स्वागत करण्यात आले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.