तलवार बाळगल्याप्रकरणी दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाईपलाईन रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ गर्दी जमा झाली असताना व तेथे काही जण एकमेकांना शिवीगाळ करत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तलवार बाळगल्याने त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोहेकॉ. गिरीश कुमार केदार (नेमणूक तोफखाना पोलिस ठाणे) हे शुक्रवारी (दि.१३) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पाईपलाईन रोडवरील पेट्रोल पंपावरुन घरी जात असताना तेथे त्यांना गर्दी जमलेली दिसली. यावेळी काही लोक आरडाओरड करत एकमेकांना शिवीगाळ करत होते. 

यावेळी तेथे महेश खंडू म्हस्के व संदीप खंडू म्हस्के (दोघे रा. पाईपलाईन रोड, नगर) हे हातात तलवार घेवून तेथे आले. तेव्हा पोहेकॉ. केदार यांच्या फिर्यादीवरुन म्हस्के बंधूंविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी गाजरे हे करीत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.