नगर -सोलापूर रस्ता सहा पदरी होणार : खा. गांधी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बळीराजाला सुखवायचे असेल तर पावसाची गरज आहे, त्यामुळे आपण सर्वांनी विठुरायाच्या दर्शनाबरोबर पाऊस घेऊन या, असे म्हणत खा. दिलीप गांधी यांनी संत कवी महिपती महाराजांच्या कार्याचा गौरव केला. संत कवी महिपती महाराज देवस्थान पालखी सोहळ्याला माहिजळगाव येथे खा. दिलीप गांधी यांच्या वतीने पंगत देण्यात आली. 

Loading...
यानिमित्त खा. गांधी यांनी पूजन केल्यानंतर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी खा. गांधी म्हणाले, महिपती महाराजांनी मोठे काम उभे केले असल्याचे सांगताना आगामी काळात नगर -सोलापूर रस्ता सहा पदरी होणार आहे, पुढीलवर्षी याच रस्त्यावरून वारकऱ्यांना कुठलाही त्रास न होता अत्यंत चांगला प्रवास करता येईल, असा विश्वास व्यक्त केला. 

या वेळी संस्थानचे बाबासाहेब वाळुंज यांनी खा. गांधी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना आम्ही हक्काने खासदारांकडे जातो त्यावेळी ते कशालाच नाही म्हणत नाहीत, असे म्हटले.

या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोकराव खेडकर, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष अभय बोरा, अर्बन बँकेचे संचालक किशोर बोरा, नानासाहेब तोरडमल, ज्ञानदेव लष्कर, भिगवणचे अध्यक्ष अभय रायसोनी, सचिन बोगावत, नितीन बोगावत, राहुल गुदेचा, गिरीश मुनोत, नानासाहेब तोरडमल, नवनाथ शिंदे, दादासाहेब काळदाते, भानुदास हाकेमेजर, आदींसह संस्थानचे दिंडी अध्यक्ष नाना महाराज गागरे, चोपदार राजू चव्हाण व कांता कदम, वीणेकरी बापूसाहेब गागरे, सेक्रेटरी बाळासाहेब मुसमाडे, बाळकृष्ण महाराज कांबळे, देवकर महाराज आदी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.