शेवगाव तालुक्यात बसखाली चिरडून वृद्धा ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे पैठण बालमटाकळी एस.टी बसखाली चिरडून साळूबाई नबाजी घोरपडे (वय.७०) या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंगी सेवा संस्थेजवळील पैठण पंढरपूर महामार्गावर घडली. 


Loading...
याबाबत माहिती अशी, पैठणहून बालमटाकळीला येणारी बस क्र.एम.एच.२०- ०५९७ ही पैठण आगाराची एस.टी. बस मुंगी वरून जात असताना साळूबाई नबाजी घोरपडे या आपल्या नातेवाईक मुलीकडे हातगाव येथे जाण्यासाठी थांबल्या होत्या. 

बस आल्यानंतर बसमधील प्रवासी उतरताच त्या बसमध्ये बसण्यासाठी बसच्या समोरून जात असतानाच चालकाच्या लक्षात न आल्याने चालकाने बस मार्गस्थ केल्याने साळूबाई घोरपडेंचा बसच्या पुढील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. 


याबाबत गावचे सरपंच बबन भुसारी यांनी पोलिसांनाही कळवले. जवळपास एक तासाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बस चालक सुबान उस्मान पठाण यास बससह ताब्यात घेऊन, मृत महिलेस शेवगाव येथे उत्तरीय तपासणी करण्यासाठी पाठवले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.