नगर - औरंगाबाद रस्त्यावर हॉटेलच्या वादातून खुनाचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हॉटेल चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या वादातून दोन गट एकमेकांस भिडले. लोखंडी गज, सत्तूर, कोयत्याने झालेल्या या हाणामारीत पाच जण जखमी झाले. ही घटना नगर - औरंगाबाद रस्त्यावरील खोसपुरी शिवारातील पांढरीपूल येथील आठवण हॉटेलसमोर शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.