कर्जाला कंटाळून सोनईत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोनईचे कन्हेरवस्ती येथे तरुण शेतकरी सखाराम तुकाराम निमसे (वय ३३) यांनी कर्जाला कंटाळून शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि. १३) सकाळी निमसे वस्तीवर भल्या पहाटेच शेडमध्ये लटकलेला सखाराम पपाहून नातेवाईक व घरच्या लोकांनी अतिशय घाईने त्याला शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात नेले.

Loading...
परंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीच या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असल्याचे ड्युटीवरील वैद्यकीय अधिकारी डॉ. कोरडे यांनी तपासणी करुन नातेवाईकांना सांगितले. तसेच याबाबतचा अहवाल सोनई पोलीस ठाण्याला कळविले वरून सोनई पोलिसांनी अकस्मात मृत्यू र.क्र. २२/२०१८ दाखल केला असून सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार प्रवीण आव्हाड पुढील तपास करीत आहेत. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर कन्हेरवस्ती सोनई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.