श्रीगोंदा कारागृहातच आरोपींची हाणामारी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंद्यात पोलीस ठाण्याच्या दुय्यम कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोन आरोपींमध्ये मारामारी झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.त्याला उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार करून कारागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रीगोंदा दुय्यम कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले मंगेश भारत चव्हाण वय २४ रा.जलालपूर ता.कर्जत आणि राजू सायंत्या पवार रा.पेडगाव ता. श्रीगोंदा यांच्यात दि.१४ रोजी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी किरकोळ कारणातून वाद सुरु झाला आणि कारागृहातील जेवणाच्या भांड्याने त्यांनी एकमेकांस मारहाण करण्यास सुरवात केली. 

Loading...
त्यावेळी उर्वरित आरोपींनी आरडाओरडा केल्यावर दुय्यम कारागृहाच्या पहाऱ्यावर असलेल्या बेलवंडी पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर भोसले यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पहिले असता. दोघेजण जेवणाच्या भांड्याने एकमेकांना मारहाण करताना दिसले.

त्यांनी गार्ड अंमलदार महिला पोलिस आशा खामकर व पोलीस कॉन्स्टेबल संतोष कोपनर यांना बोलावून कारागृहाचे बराक नं ३ चा दरवाजा उघडून पहिले असता. मंगेश भरत चव्हाण याचे डोक्यास मार लागल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ त्यास उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हलविण्यात आले व त्या ठिकाणी उपचार करण्यात आले.

त्याच्यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्याचे ईश्वर भोसले यांनी कारागृहात मारामारी केल्या प्रकरणी भादंवि १६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून. या प्रकरणाचा तपास श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रेवनाथ दहिफळे हे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.