धनगर समाजाला आरक्षण मिळणारच : आ.शिवाजी कर्डिले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेस -राष्ट्रवादीने घाईघाईत मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले, पुढे ते कोर्टात टिकले नाही, त्याची पुनावृती होऊ नये म्हणून सर्व कायदेशीर बाबी तपासून धनगर समाजाला आरक्षण हमखासपणे मिळेल, असे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. 

आडगाव, ता. पाथर्डी येथे ८० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आ. कर्डिले बोलत होते. आ. कर्डिले पुढे म्हणाले, अधिवेशनात उगाच आरडो ओरड करून प्रश्न सुटत नाहीत, कागदपत्रांचा पाठपुरावा करून विकासकामे मार्गी लावावी लागतात. तुम्ही एवढे अभ्यासू होता, बोलणारे होता तर मग जनतेने तुम्हाला का घरी बसवले, असा टोला आ. कर्डिले यांनी तनपुरेंना लगावला. 

Loading...
ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी पंचवीस पंधरा मधून पंधरा कोटीचा निधी मिळाला असून, या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध गावचे अंतर्गत रस्ते, वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्ते, नवीन ग्रामपंचायत कार्यालय, यासह अनेक विकासकामे मार्गी लावली जाणार आहेत. 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मिरी-शंकरवाडी रस्ता, तिसगाव -मांडवा -चिचोंडी रस्ता, लोहसर -पवळवाडी रस्ता, मिरी -तिसगाव रस्ता, कोल्हार ते शिराळ ररता, चिचोंडी ते करंजी रस्ता आदी रस्त्यांसाठी निधी दिला आहे. उर्वरित रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिला ज़ाईल. विरोधक मतदारसंघात फिरू लागले की, समजायचं निवडणुका जवळ आल्याचा टोला आ. कर्डिले यांनी लगावला. 

या वेळी जालिंदर लोंढे, देवीदास लोंढे, बाळासाहेब गोफणे, परसराम लोंढे, सूर्यभान लोढे, सुखदेव शेंडे, पोपटे लोढे, भाऊसाहेब बर्फे, रामनाथ लोढे, बाबासाहेब वाघमोडे, भाऊसाहेब नजन, संजय चांडे, अंबादास लोंढे, माणिक पटेकर उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.