भिंडेंनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी -अजित पवार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्रातील संतांमुळे राज्याला एक वेगळी ओळख आहे. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायात महान संत झाले. संपूर्ण जग त्यांना मानते. वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतो. तरुण-अबाल-वृध्द, स्त्री-पुरुष, असा भेद मानत नाही. 

Loading...
मात्र, कोणीतरी संभाजी भिडे उठतो अन् खुशाल म्हणतो, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजापेक्षा मनु श्रेष्ठ आहे. त्यांना जनाची नाहीतर मनाची लाज कशी वाटत नाही, अशा शब्दात संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी समाचार घेतला.


९७ टक्के समाजाला क्षुद्र समजणाऱ्या मनुला भिडे सर्वश्रेष्ठ मानतात. शाहू, फुले आंबेडकरांनी महाराष्ट्राला अशी शिकवण दिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार नाहीत. समाजात दुही माजण्याची हे कटकारस्थान आहे. त्यातून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा हा उद्योग आहे. 

सरकारच्या धरणातून हे प्रगट होत आहे. शेतकऱ्याला पीकविम्याची रक्कम, सरसकट कर्जमाफी मिळत नाही. शेतीमालाला दीडपट सोडा आधारभूत किंमत मिळेना. दुध परदेशात पाठवल्यावर पाच रुपये अनुदान मिळणार आहे.धनगर समाजाने भाजपाला साथ दिल्याने राज्यात भाजप सत्तेवर आला. 

मात्र, धनगरांना आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. खासगी अभ्यासगट समित्यांची नेमणुका करून धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.आम्ही कोणाचीही फसवणूक केली नाही.मात्र, धनगर समाज भाजपा शिवसेनेचा मागे गेल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत आले नाही, अशी टीका त्यांनी केली. 
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.