श्रीगोंद्यात इच्छुक तरुण उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने आतापासूनच इच्छुक तरुण उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. . शहरातील अनेक तरुणांना नगरसेवक होण्याचे डोहाळे लागले असून, त्यादृष्टीने त्यांनी आतापासूनच नेत्यांची मनधरणी करीत आपणच आपल्या प्रभागातील प्रबळ उमेदवार असल्याचे दाखवण्यासाठी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. 


Loading...
त्यासाठी वाढदिवस हे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सध्या एक प्रभावी साधन ठरत आहे. सध्या नगरसेवक होण्याचे दिवास्वप्न अनेक तरुण पाहत आहेत. चालू पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुक तरुणांची संख्या मोठी आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:चा वाढदिवस थाटामाटात साजरा करत,तरुणवर्गाला खुश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बरं जिथे गर्दी तिथे राजकीय नेते येणार नाहीत. 

असे होणे दुर्लभच त्यामुळे या इच्छुक तरुणांच्या वाढदिवसाला नेतेमंडळीसह इच्छुक देखील गर्दी करत आहेत. या तरुणांचा आपल्याला पाठिंबा मिळावा. यासाठी नेते देखील प्रयत्न करत असून, संबंधित तरुणच आपला उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. 


याचसोबतच सोशलमीडिव्दारे भावी नगरसेवक म्हणूनच शुभेच्छा देत आहेत.येत्या नगरपरिषद निवडणुकीत तरुणांचा मोठा सहभाग राहणार असल्यामुळे या निवडणुकीत रंगत येणार. तसेच राजकीय नेत्यांची देखील टिकीट वाटप करताना डोकोदुखी वाढणार आहे. हे देखील निश्चित आहे. असे असले तरी दांडगा जनसंपर्क, आर्थिकदृष्टया सक्षम असलेल्या उमेदवारांकडेच नेत्यांचा कल राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्यक्षात किती नवीन तरुण उमेदवारांना मतदार स्वीकारतात हे येणारा काळच ठरवेल.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.